वाद पेटला ! ‘अमित शहा खुनी है’ घोषणांनी सभागृहातील वातावरण तापले

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले 

मुंबई –  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्यावर आरोप केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीन दिलेली दिलेली तक्रारच वाचून दाखवली.  याचदरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यांच्यात वादंग निर्माण झाला. या शाब्दिक चकमकीत  ‘अमित शहा खुनी है’  अशा  घोषणा देण्यात आल्याने  सभागृहात वातावरण चांगलेच तापले.

हिरेन यांच्या पत्नीची तक्रार वाचून दाखवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी सदर कार वापरली होती. ४ महिने कार वाझे यांच्याकडे होती. २६-२-२०२१ वाझे यांच्यासोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि त्यांच्याच सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता.

वाझे यांनी माझ्या पतीला अटक करुन घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असेही सांगितले होते. यानंतर  गृहमंत्री अनिल देशमुख निवेदन देण्यासाठी उभे राहिले असता दोन्ही बाजूने गोंधळ सुरू झाला. यावेळी  सभागृहात ‘अमित शहा खुनी है; अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने- सामने आले. 10 मिनिटानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले पण गोंधळामुळे पुढे अर्धा तास तहकूब करण्यात आले.

दरम्यान, ठाणे शहर पोलीस यांच्याकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे गृह विभागाने दिलेल्या आदेशानंतर वर्ग करण्यात आला आहे. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, मृत मनसुख हिरन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांच्या फिर्यादीवरून द वि प पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.