पुतिन अमेरिकेला देणार जशास तसे उत्तर

रशियाही करणार बंदी असलेल्या क्षेपणअस्त्रांची चाचणी

मॉस्को- गेल्या आठवड्यात अमेरिकेने आंतरखंडीय क्षेपणअस्त्रांची चाचणी केल्यानंतर चवताळलेल्या रशियाने ही आता त्याच प्रणालीतील मिसाईलची चाचनी करणार असल्याची घोषणा केली असून आम्ही अमेरिकेला जशास तसे उत्तर देणार असल्याचे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिनयांनी सांगितले आहे.

अमेरिका आणि रशिया दरम्यान काही वर्षांपुर्वी झालेल्या करारांनुसार काही क्षेपणअस्त्रांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अमेरिकेने बंदी घालण्यात आलेल्या क्षेपणअस्त्राची चाचणी केल्यानंतर रशियानेही आता त्याच श्रेणीमधील क्षेपणअस्त्राचे परिक्षण करणार असल्याचे सुतोवाच दिले आहेत. पुतिन यांनी या संदर्भात आपल्या लष्कराला तयार रहाण्यास सांगितले असून अमेरिका अशा प्रकारच्या क्षेपणअस्त्राचे परिक्षण करुण आपल्यावर दबाव आणू शकत नाही असेही त्यांनी यावेळी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले.

अमेरिकेने लांबपल्ल्याच्या टॉमहॉक या आंतरखंडीय अणुवाहक क्षेपणअस्त्राचे परिक्षण केल्यानंतर चीन आणि रशिया या दोन्ही देशांनी अमेरिकेला आपल्या मधील करारांची आठवण करुन देत सुचना केल्या होत्या. मात्र, अमेरिकेने त्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत या क्षेपणअस्त्राचे परिक्षण केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यासंदर्भात आयोजीत एका बैठकीत पुतिन यांनी लष्करी आधिकाऱ्यांना सांगितले की, अशा प्रकारचे अनेक क्षेपणअस्त्र अमेरिका आता युरोप खंडातील पोलंड आणि रोमानिया येथे स्थापण करु शकतात जेणे करुन रशिया अमेरिकी क्षेपणअस्त्रांच्या पट्‌टयात येऊ शकेल. रशिया आशा प्रकारच्या कृत्यांना खपवून घेणार नसून आता आपणही अशा प्रकारच्या क्षेपणअस्त्रांचे परिक्षण करण्यास मोकळे असल्याचेही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×