#INDvWI : भारतीय संघाची घोषणा; बुमराहला वनडे आणि टी-20 मध्ये विश्रांती

मुंबई – वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी 21 जुलै रोजी भारतीय क्रिकेट निवड समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने पत्रकार परिषद घेत टीमची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हा दौरा 3 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 मॅचेस, 3 वन-डे मॅचेस आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे.

टीम इंडियात शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे तर हार्दिक पांड्याला आराम देण्यात आला आहे. टी-20 क्रिकेट टीममध्ये राहुल चहल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, खलिल अहमद यांसारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विंडीज दौऱ्यात नसेल हे त्याने आधीच स्पष्ट केले होते, त्याच्याजागी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय व टी-20 संघातून विश्रांती देण्यात आली आहे. केवळ कसोटी संघात बुमराहला स्थान देण्यात आले आहे, तर एकदिवसीय प्रकारात सातत्याने चांगला खेळ करणाऱ्या शिखर धवनला कसोटी संघात संधी मिळालेली नाही. त्याच्याऐवजी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी कसोटी संघात पुनरागमन केले आहे. या दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळेल.

एकदिवसीय मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्‍वर कुमार, खलिल अहमद, नवदीप सैनी.

टी-20 मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्‍वर कुमार, खलिल अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)