जामिनात जास्तीच्या रकमेची अट चुकीची (भाग-२)

जामिनात जास्तीच्या रकमेची अट चुकीची (भाग-१)

एवढ्या छोट्या मंदिरात आपले एवढे उत्पन्न नसून आपण एवढे पैसे भरण्यास असमर्थ असल्याचे प्रतिज्ञापत्र पुजारी धनपाल यानी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकली. अपील कर्ता धनपाल पुजारी याने आपण जे धार्मिक कार्य करतो. त्यातून एवढी रक्‍कम भरणे आपल्याला अशक्‍य असल्याचे सांगितले व हे मंदिर व त्याचे उत्पन्न कमी असल्याचे पुरावे न्यायालयासमोर आणले. तर सरकार पक्षातर्फे पोलीस महानिरीक्षक यांनी आपली बाजू मांडताना आरोपीच्या वकिलांनी नुकसानभरपाईपोटी दहा लाख रु. प्रत्येकी देण्याची अट मान्य असल्याचे सांगितले होते व तसे न्यायालयात सांगितल्याचेही स्पष्ट केल. त्यामुळे त्यांची पैसे भरण्याची ऐपत असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजू ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाने जामिनासाठी अशा प्रकारे अट टाकणे चुकीचे आहे . प्रा

थमिक चौकशी अहवालातील तपशिलानुसार कोठेही प्रत्यक्ष सबंधित पुजारी या गुन्ह्यातील दोषी असल्याचे स्पष्ट होत नाही. त्याच प्रमाणे न्यायालयाने जामीन देताना अशी भक्‍कम रक्‍कम भरून जामीन दिला जाईल, अशी अट टाकताना किमान त्या व्यक्‍तीची पात्रता तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा अटीवर जामीन देणे चुकीचे असून न्यायालयाने योग्य वाटेल त्या इतर अटी टाकून जामीन करावा असा आदेश देत अपीलकर्त्याची याचिका मंजूर करीत कनिष्ठ न्यायालयाने योग्य त्या अटीसह जामीन मंजूर करावा असे सांगितले. एकूणच जामीन देताना रकमेच्या अटीबाबत सर्वच न्यायालयांना मार्गदर्शन करणारा हा निकाल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.