55 हजार रुपयांचा ऐवज लांबविला

नगर: भिंगारमधील माळगल्ली येथे घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा एकूण 55 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्रीपावणेअकरा ते शुक्रवारी (दि.3) सकाळी सहा वाजेदरम्यान चोरट्यांनी विशाल जयप्रकाश गायकवाड यांच्या बंद घराचे कुलूप तोडले.

घरातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीचा प्रकार लक्षात येताच गायकवाड यांनी पोलिसांना कळवले. त्यावरून भिंगार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात विशाल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार पाठक हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.