लॉकडाऊन दरम्यान ‘खजूर’ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

नियमीत 3/4 खजूर खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

पुणे – खजूर हे सुक्‍या मेव्यातील फळ सगळ्यांनाच आवडते. जातीनुसार खजुराची गोडी बदलते पण, सर्वच खजुरात भरपूर प्रथिने, कर्बोदके, शर्करा, सेल्युलोज असते म्हणून पोषक अन्न म्हणून खजूर अत्यंत उपयुक्त आहे.

खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

आजारातून उठल्यावर खजूर खाल्ल्याने शक्ती लगेच भरून येते. खजुराचा डॉक्‍टरांच्या टॉनिकसारखा उपयोग होतो. नुसता खजूर हा उष्णदायी असल्याने अनुपान म्हणून दूध आणि साजूक तूप यातील एका घटकाचा उपयोग करतात.

अनेक स्त्रियांना गर्भाशयासंबंधीत काहीतरी तक्रारी असतातच. त्यामुळे गरोदर स्त्रियांना पोषक अन्न म्हणून रोज 3/4 खारका किंवा खजूर खायला दिल्यास त्यांना त्या उपयोगी ठरतात.

एरवी सुद्धा खजुराचा वापर अधूनमधून ठेवल्यास आपली कार्यक्षमता वाढते, शक्ती वाढते.
अशक्त माणसांना खजुराची खीर द्यावी. त्यांच्या साठी ती अतिशय लाभदायक आहे.

दररोज सकाळी 7/8 खजूर खाऊन त्यावर 1 ग्लास गरम दुध प्यायल्याने शरीराची ताकद वाढते, नवीन रक्त निर्माण होते, उत्साह आणि स्फ़ूर्ती वाढते व वजन वाढण्यास मदत होते. नियमीत खजूर खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.