शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठ गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप…

पुणे : चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि मोग-याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी आॅनलाईन पद्धतीने दर्शन घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही पुष्परचना केली. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 200 किलो मोगरा, 1100 चाफ्याची फुले, डच गुलाब, दवणा, टगर, गुलछडी, गावरान गुलाब, झेंडू, ग्रीन पासली आदी प्रकारची शेकडो फुले वापरण्यात आली. तसेच श्रीं च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.