मुंबई – भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन सिंधुदुर्गात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून परिचीत असेलल्या अमित शाह यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी शाह यांनी शिवसेनेने युती तोडल्यावरून टीका केली. याच टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारणशी बोलतांना प्रत्युत्तर उत्तर दिले आहे.
ते म्हणाले,’केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हटवादीपणामुळे भाजपपासून दूर झाले आहेत. ते खोटारडे आणि विश्वासघातकी आहेत. शाह यांच्या अशा स्वभावामुळेच सतरा पेक्षा जास्त पक्ष एनडीएतून बाहेर पडले. आता त्यामुळे विश्वासघातकी नेमकं कोण, हे आता दिसून येत. तसेच युती वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे युती तुटल्याचे केंद्रातील नेत्यांनी मान्य केले आहे . असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.