‘तिथे’ हवा अत्यंत खराब ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका

वॉशिग्टन: अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वहत्याना दिसत आहे. त्यात अमेरिकन अध्यक्षीय डिबेटमध्ये हवामान बदलावर बोलताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. भारतातील हवा ही अत्यंत खराब असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या प्रश्नावरुन त्यांनी चीन आणि रशियावरही हल्ला केला. चीन हा जगातील सर्वाधिक कार्बनचे उत्सर्जन करणारा देश आहे. त्यानंतर अमेरिका, भारत आणि युरोपिन युनियनचा नंबर लागतो.

प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांच्याशी केलेल्या शेवटच्या अध्यक्षीय डिबेटमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनमध्ये पाहा किती प्रदूषण आहे, रशियामध्ये पहा, भारताचेही उदाहरण घ्या. तिथे हवा किती खराब आहे. तसे अमेरिकेत नाही. अमेरिकेत हवा किती स्वच्छ आहे, पाणी किती शुद्ध आहे. अमेरिकेत कार्बन उत्सर्जनावर किती चांगले उपाय अवलंबले आहेत, असं ट्रम्प म्हणाले.

ते पुढे म्हणाले की चीन, भारत आणि रशिया यासारखे देश हे जागतिक प्रदूषणाच्या विषयावर गंभीर नाहीत. वातावरण बदलाच्या प्रश्नावर अमेरिकेने आतापर्यंत अब्जावधी डॉलर्स खर्च केलेत पण त्याचा आपल्या देशाला फायदा न होता तोटाच होत होता. त्यामुळे अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली. वातावरण बदलाच्या प्रश्नावरुन ट्रम्प यांनी चीन आणि भारतावर याआधीही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं होत की चीन आणि भारत असे देश आहेत की जिथे आपल्याला श्वास घ्यायलाही अडचण येते.

वातावरण बदलावर 2015 साली करण्यात आलेल्या पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. या करारामध्ये जागतिक हवामान हे 2 टक्क्यांपेक्षा खाली ठेवण्याचा उद्देश जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी या करारामुळे अमेरिकन उद्योगांना आणि कामगार वर्गाला तोटा होईल या कारणामुळे ट्रम्प यांनी यातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं होतं. या कराराचा सर्वाधिक फायदा हा केवळ चीन आणि भारताला होणार आहे अशी त्यांनी सातत्याने टीका केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.