करोना संकट काळात एअर फोर्सची होतेय मोठी मदत; जर्मनीहून आणले काय्रोजनिक ऑक्‍सिजन कंटेनर्स

नवी दिल्ली, दि. 4 – ऑक्‍सिजनची वाहतूक करण्यासाठी हवाईदलाने विमानातून जर्मनीहून चार काय्रोजनिक ऑक्‍सिजन कंटेनर्स हिंदोनच्या हवाईतळावर आणले आहेत. तसेच ब्रिटनहून 900 ऑक्‍सिजन सिलिंडर्स आणून ते चेन्नईला पोहचवण्याचे कामही हवाईदलाकडून सुरू आहे.

केवळ विदेशातूनच नव्हे तर देशांतर्गतही ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी हवाईदलाची मदत घेतली जात आहे. देशाच्या विविध भागात ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासाठी हवाईदलाच्या विमानांना पाचारण केले जात आहे.

सुलूर आणि कोईम्बतुर येथून दोन ऑक्‍सिजन प्लांटही हवाईदलाच्याच विमानातून अन्यत्र हलवले जात आहेत. देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण दाखल झाल्याने त्यांच्याकडून ऑक्‍सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे; पण मागणीच्या तुलनेत ऑक्‍सिजनचा पुरवठा मात्र कमी पडत आहे. ही स्थिती अजून सुधारलेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.