ऍसिड हल्ला पिडितेच्या व्यथा, तिचा संघर्ष सर्वत्र पोहोचला पाहिजे- रंगोली 

ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या कंगनाच्या बहिणीकडून दीपिकाची प्रशंसा

मुंबई – अॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ चित्रपटाचा काल ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण लक्ष्मी अग्रवाल यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यांच्या कडा ओलावणारा या ट्रेलरमध्ये दीपिकाच्या दमदार अभिनयाची दमदार झलक पाहायला मिळेल. अॅसिड हल्ला तरुणी लक्ष्मी अग्रवाल हिच्या सोबत झाली ती दुर्दैवी घटना आणि त्या घटनेनंतर तिने सुरु केलेला लढा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविला जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, ‘छपाक’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बहिणीनेही ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि काही आव्हानांचा सामना केलेल्या रंगोली हिने अतिशय सुरेख शब्दांत दीपिका आणि मेघना गुलजार यांना दाद दिली आहे.

रंगोलीने म्हंटल कि, ‘सर्वांनीच हा ट्रेलर पाहावा, असं म्हणत रंगोलीने स्वत: या ट्रेलरचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर, आणखी एका ट्विटमध्ये तिने मेघना आणि दीपिका या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनाच भावूक करणार आहेत, अशा ओळी लिहित आपण आणि आपल्या कुटुंबाने ज्या यातना सहन केल्या आहेत त्या, मरणयातनांपेक्षा जास्त होत्या असं म्हणत आपल्या वेदना शब्दांवाटे व्यक्त केल्या. प्रत्येक ऍसिड हल्ला पिडितेची व्यथा, तिचा संघर्ष हा साऱ्या देशात पोहोचला पाहिजे असं देखील तिने म्हंटल आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. तर दीपिका पदुकोणही या चित्रपटाची निर्मिती करत आहे. दीपिकासह विक्रांत मेसीही चित्रपटात मुख्य भूमिका निभावत आहे. या चित्रपटात दीपिकाचे नाव मालती असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)