सोलापुरात संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालीच आंदोलन

सोलापूर – सोलापुरात आज मराठा आरक्षणासंबंधात दोन बैठका पार पडल्या. मराठा समाज क्रांती संघटनेची बैठक डाक बंगला येथे तर सकल मराठा समाजाची बैठक छत्रपती शिवाजी प्रशालेत झाली. या बैठकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालीच सोलापुरातील मराठा समाजाचे आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती अमोल शिंदे यांनी दिली.

अमोल शिंदे म्हणाले, मराठा समाज शांत आहे आणि एकजुटीने समाजाचे प्रश्न निश्‍चितच सुटतील. संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात हे शक्‍य आहे, असे मत समाजातील स्थानिक नेते मंडळीच असल्याचे बैठकीत चर्चेवेळी पुढे आले आहे.

यानंतर काही वेळांनी सकल मराठा समाजाची बैठक छत्रपती शिवाजी प्रशालेत झाली. या बैठकीवेळी डाक बंगल्यातील बैठक संपवून मराठा समाजाचे प्रमुख नेते येथे आले. मराठा समाजात दुही नको, समाजाच्या उन्नतीसाठी एकोप्याने आपण आंदोलन करू, संभाजीराजे छत्रपतींचे नेतृत्व सर्व मान्य आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

सकल मराठाचे माऊली पवार म्हणाले, संभाजी महाराजांच्या नेतृत्वात आंदोलन यशस्वी होईल. लवकरच दोन्ही संघटना पत्रकार परिषद घेवून पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.