आंदोलन करणाऱ्या आरोग्य विभागातील 1000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

चंदीगड, दि. 11 – पंजाबच्या आरोग्य विभागाने आंदोलन करणाऱ्या सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत त्यांना जेथे काम नेमून दिले होते तेथे ते न रूजू झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हे कर्मचारी आपल्याला कायम करावे या मागणीसाठी आंदोलन करीत होते व त्यांनी कामावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

या विभागात एकूण नऊ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. आपल्याला सेवेत कायम करावे या मागणीसाठी ते सध्या संपावर आहेत. तथापि, आरोग्य मंत्री बलसीरसिंग संधु यांनी केलेल्या आवाहनानंतर आठ हजार कर्मचारी कामावर परतले परंतु एक हजार कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता दुसरे कर्मचारी नेमले जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन कोविड काळात ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. तथापि, आता ती हळूहळू पूर्ववत होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.