बाधित खेळाडू लवकरच संघात परततील

बीसीसीआयने व्यक्त केला विश्‍वास

मुंबई – अक्‍सर पटेल, नितीश राणा व देवदत्त पडीक्कल यांच्यासह अन्य काही खेळाडू तसेच कर्मचारी मिळून एकूण 20 जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने स्पर्धेबाबतच शंका घेतली जात आहे. मात्र, हे सर्वजण करोनातून मुक्‍त होऊन विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुन लवकरच संघात परततील असा विश्‍वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत असून स्पर्धेचा अंतिम सामना 30 मे रोजी होणार आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये चेन्नईत रंगणार आहे. तर, 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स मुंबईच्या वानखेडेवर आमने सामने असतील.

आयपीएलपूर्वी कोहलीच्या बेंगळुरू संघाला धक्‍का बसला आहे. संघाचा नवोदित सलामीवीर देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत पॉझिटिव्ह ठरला आहे. देवदत्तच्या पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू अक्‍सर पटेल करोना चाचणीत पॉझिटिव्ह ठरला होता.

यंदाच्या आयपीएलमध्ये करोनाची बाधा पटेल दुसरा तर, पडीक्कल तिसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणालाही बाधा झाली होती. मात्र, पुढील चाचणीत तो निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.