बाजार समितीचे प्रशासकीय मंडळ शेतकऱ्यांना न्याय देईल ; मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

केडीसीसी बँकेत केला सत्कार

कोल्हापूर : कोरोना महामारीचा सर्वात मोठा फटका शेतकरी व त्यांचा शेतीमाल विकणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत मिळावी, अडचणीत असलेल्या हमाल तोलाई आवडती यांना त्याचा फायदा होण्यासाठी बाजार समितीचे प्रशासकीय अध्यक्ष के पी पाटील यांचा कारभार पारदर्शी व लोकाभिमुख होईल असा विश्वास ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदी निवड झाल्याबद्दल के पी पाटील व सदस्यांचा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पी एन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाजार समितीचे प्रशासकीय अध्यक्ष केपी पाटील म्हणाले, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांमुळे आपणास ही संधी मिळाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेली कृषी समिती सक्षम असली पाहिजे यासाठी आम्हा सर्व प्रशासक मंडळाचा प्रयत्न असेल. या माध्यमातून बाजार समितीशी संबंधित सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य प्रा. जालंदर पाटील, बी एच पाटील, सचिन घोरपडे, करणसिंह गायकवाड, सूर्यकांत उर्फ बाळासाहेब पाटील, आर वाय पाटील, अजित बाबुराव पाटील, अजित पांडुरंग पाटील, दिगंबर पाटील, दगडू भास्कर आदी प्रमुख उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.