बेल्हे – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान होऊनही पर्जन्यमापकावर झाडीचे साम्राज्य असल्याने अचूक पर्जन्यमापन होत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते.
“जुन्नरमधील पर्जन्यमापक फॉल्टि’ बेल्ह्यातील पर्जन्यमापकावर झाडीचे साम्राज्य, या मथळ्याखाली रविवारी (दि. 4) वृत्त प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेत प्रशासनाने गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असणाऱ्या पर्जन्यमापकावरील झाडांच्या फांद्या तात्काळ तोडल्या आहेत.
यामुळे आता अचूक पर्जन्यमापन होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भाऊसाहेब भांबेरे, बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर आणि बेल्हे व परिसरातील शेतक ऱ्यांनी दै. “प्रभात’चे आभार मानले आहेत.