प्रशासनाने भीषण दुष्काळाच्या सावटाकडे गांभीर्याने बघावे- छगन भुजबळ

नाशिक: राज्यातील भीषण दुष्काळाच्या सावटाकडे प्रशासनाने गांभीर्याने बघावे व योग्य नियोजन करून नेमका तोडगा काढावा यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सुपूर्द केले.

राजकारण, निवडणुका या येतात, जातात परंतू आज दुष्काळात सापडलेला बळीराजा उध्दवस्त झाला, तर आख्खा देश संपुष्ठात येईल. यामुळे प्राध्यान्यक्रमाने टंचाईच्या काळात बळीराजाला वाचिवण्यासाठी तसेच बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना दिलासा देण्यासाठी निवडणुका बाजूला ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  दुष्काळी दौरे अयोजित केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडून दुष्काळी भागाची पाहणी करण्यात येत आहे. खुद्द शरद पवार यांनी देखील मंगळवार दि.30 एप्रिल रोजी सांगोल्याला गेले. त्यानंतर त्यांनी अजनाळे येथे दुष्काळाने जळालेल्या फळबागा, कोरडी पडलेल्या शेततळ्यांची पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.