नवी दिल्ली – करोना बाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा थांबवली आहे. सर्वोच्च न्यायालयातील 44 कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. त्यामूळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश एक तास उशीरा कामकाज पाहतील.
सर्वोच्च न्यायलयातील सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार या न्यायालयातील अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे न्यायालायाचे आवार, कोर्टरूम आणि अन्य ठिकाणी निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामूले खंडपीठ आपल्या नियोजित वेळेनंतर एक तास उशीरा कामकाज सुरू करतील, असे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.
व्यक्तीश: सुनावणीसाठी दाखल करावायच्या केसेस पुढील सूचना ऐईपर्यंत स्थगित ठेवण्यात येणार आहेत. मात्र त्याच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या सुनावणी मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे न्यायालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.