मुंबई – अभिनेत्रींचे बोल्ड आणि सुंदर फोटो सोशलवर नेहमीच चर्चेत असतात. अभिनेत्रींच्या हटके स्टाईल आणि मेकअपवर टिप्स नेहमीच चाहते फॉलो करत असतात. मात्र अनेकदा अभिनेत्रींना त्यांचा सोशलवर मीडियावरील पोस्ट मुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
असाच काही ट्रोलिंगाचा सामना अभिनेत्री तिलोत्तमा शोमला सोशलवर करावा लागत आहे. सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे. पण हा फोटो नेहमीपेक्षा जरासा वेगळा आहे. काखेतील केस दाखवतानाचा फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
काखेतील न केस काढलेले कॅमेऱ्यात दिसत आहेत. तिच्या याच फोटोवर नेटकरी उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. कुणी तिच्या बिनधास्तपणाची स्तुती करतंय, तर कुणी ‘बिनकामाचा बिनधास्तपणा’ म्हणत तिच्यावर शेरेबाजी करतंय. पण या सगळ्यानंतर मी टाकलेल्या फोटोबद्दल माफी मागणार नसल्याचंही तिलोत्तमाने ठासून सांगितलं आहे.
View this post on Instagram
तिलोतमाने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या टी-शर्टवर क्षमाशील नाही असे लिहिले आहे.हि पोस्ट करत तिलोतमाने तिच्या काखेतल्या केसांविषयी बोलताना म्हणाली,“शरीरावर असलेल्या केसांबद्दल मी माफी मागणार नाही.मला ते आवडतात म्हणुन ते मी ठेवले आहे.मी वॅक्स करते आणि नाही सुद्धा.”
View this post on Instagram
तिच्या या फोटोला टीका करणाऱ्या युजर्सला तिच्या फॅन्सनेच सडेतोड उत्तर देत तिच्या या फोटोला पाठिंबा दिला आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी तिला पाठिंबा दिला. एका यूजरने लिहिले, ‘तिलोत्तमाला ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नको… शरीराचे केस नैसर्गिक आहेत…. लोकांना त्यांच्या शरीराच्या अवयवांबद्दल वाईट का वाटते !! मग शरीराच्या केसांसाठीच का..!! असो मला तू आवडतोस….’ असं म्हणत फॅन्स ने तिला पाठींबा दिला आहे.
दरम्यान तिच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास तिलोत्तमाचा ‘सर’ हा सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला होता. युकेतील एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिलोत्तमाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘रहागीर’ या सिनेमातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.