मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते.
“I don’t wear masks like him. Every time you see him, he’s got a mask!” – Trump referring to Biden
2 days later: pic.twitter.com/lexSlqgvCN
— Padma Lakshmi (@PadmaLakshmi) October 2, 2020
दरम्यान भारतीय वंशाची अमेरिकी मॉडेल, लेखिका, टेलिव्हिजन होस्ट म्हणून प्रसिद्धीस पावलेली आणि संघर्षपूर्ण पण बेधडक जीवनशैलीबद्दल प्रसिद्ध असलेल्या पद्मालक्ष्मी हिने ट्रम्प यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. “त्या दिवशी तुम्ही मास्क वापरणाऱ्यांची खिल्ली उडवली होती, अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं?”, असा उपरोधिक टोला तिने डोनाल्ड ट्रम्प यांना लगावला आहे.