मुंबई – बाल शिव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिव्या पठानिया आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकत आहे. शिव्याने आपल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. शिव्याने तिचा वाईट अनुभव सांगितला की, ‘एका बनावट निर्मात्याने तिला काम देण्यासाठी सेक्शुअल फेव्हरची मागणी केली होती.’
हमसफर शो बंद झाल्यानंतर शिव्याकडे 8 महिने काम नव्हते. हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. याच दरम्यान तिला ऑडिशनसाठी कॉल आला. त्यानंतर या ऑडिशनमध्ये शिवासोबत जे घडलं त्याने तिला धक्काच बसला.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिव्याने सांगितले की, मला मुंबईतील सांताक्रूझ येथे ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. मी त्या खोलीत शिरले जी खूप लहान होती. तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने (जो निर्माता म्हणून पोज देत होता) मला सांगितले,’जर तुम्हाला ही जाहिरात एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत करायची असेल, तर तुम्हाला तडजोड करावी लागेल.’
ती पुढे सांगते,’गमतीचा भाग जो मी कधीही विसरू शकत नाही तो म्हणजे त्याच्या लॅपटॉपमध्ये हनुमान चालीसा चालू होती. मी त्याला म्हणाले,’तुला लाज वाटत नाही का? तुम्ही भजन ऐकत आहात आणि काय म्हणत आहात?’
अनेक वर्षांनी शिव्याला कळाले की जो स्वतःला निर्माता सांगत होता तो खोटा आहे. शिव्याने तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांना त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले. शिवाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. यामध्ये एक रिश्ता पार्टनरशिप, ये है आशिकी, राधा कृष्णा, लाल इश्क, विक्रम बेताल, राम सिया के लव कुश या शोचा समावेश आहे.
शिव्याचे Insta वर 330K फॉलोअर्स आहेत. शिव्याचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर आहे. चाहत्यांमध्ये ती प्रसिद्ध आहे. फिदा या म्युझिक व्हिडिओमध्येही ती दिसली आहे. या गाण्यातील शिव्याला चाहत्यांनी खूप पसंत केले होते.