तब्बल ४.५ लाख रुपयांचे बिल न भरता ‘ही’ अभिनेत्री हॉटेलमधून फरार

अनेक सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेल्या पूजा गांधी हीच्या विरोधात फसवणुकीचा दावा दाखल केला गेल्याने टॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की अभिनेत्री पूजा गांधी ही गेल्या काही दिवसांपासून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होती मात्र हॉटेलचे बिल तब्बल साडेचार लाख झाल्याचे कळाल्याने पूजाने तेथून पळ काढला. मात्र पूजा हॉटेलचे बिल न भरताच गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल प्रशासनाने शेजारील पोलिस चौकीमध्ये हे पूजा विरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत पूजाला पोलिसांनी हटकले असता तिने सदर पंचतारांकित हॉटेलचे दोन लाख रुपयांचे बिल चुकते केले असून राहिलेली रक्कम भरण्यासाठी आपल्याला काही दिवसांची मुदत देण्यात यावी अशी विनवणी तिने हॉटेल प्रशासनाकडे केली आहे. हॉटेल प्रशासनाने देखील पूजाला उर्वरित बिल भरण्यासाठी काही दिवसांचा कालावधी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.