Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला रविवारी 19 जानेवारीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात आली असून आरोपींना पकडण्यासाठी 20 पथके तयार करण्यात आली होती. अखेर आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागील परिसरातून मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याने मोहम्मद अलियान आणि विजय दास अशी आपली नावे सांगितली. तो बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. आरोपी ठाण्यातील एका बारमध्ये हाऊसकीपिंग वर्कर म्हणून काम करत होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय दासने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलीस सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.
Maharashtra | Saif Ali Khan attack case | The arrested accused, Vijay Das, a waiter at a restaurant, has confessed to having committed the crime: Mumbai Police
(Picture confirmed by Mumbai Police) https://t.co/HyE8wE5dYQ pic.twitter.com/L2XHt5pIbd
— ANI (@ANI) January 18, 2025
सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसलेला आरोपी आणि पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयिताची शरीरयष्टीसारखीच दिसत असल्यामुळे हल्लेखोराला पकडल्याचं बोललं जात आहे. मात्र या पूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांचा प्रकरणाशी काही संबध नसल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.
Saif Ali Khan |
सैफ अली खानची प्रकृती स्थिर
दरम्यान, गुरुवारी पहाटे अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये हल्ला झाला होता. यावेळी हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर दुखापत झाल्यानंतर, सैफ अली खानला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर धारधार शस्त्राने सहा वार केले आहेत. सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करुन बाहेर काढला असून त्याच्या मानेवर आणि डाव्या हातावर झालेल्या जखमांवरील उपचाराचा भाग म्हणून प्लॅस्टीक सर्जरीही करण्यात आली आहे. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. Saif Ali Khan |
हेही वाचा:
रूपगंध : ‘दुबई चर्चेतील’ नवे प्रमेय