पिंपरी (प्रतिनिधी) – घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. याबाबत आरोपीच्या पत्नीला सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला आरोपीने मारहाण केली. ही घअना सोमवारी (दि. 12) सायंकाळी साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडली.
संदीप सोपानराव सडमाके (वय 29, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा महिलेच्या ओळखीचा आहे.
सोमवारी सायंकाळी आरोपीने फिर्यादी महिलेच्या घरात असताना तिचा विनयभंग केला. याबाबत महिला आरोपीच्या पत्नीाला सांगण्यासाठी गेली असता आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या घरच्यांना मारण्याची धमकी दिली.