नऊ महिन्यापासून फरार आरोपी जेरबंद

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी – गेल्या नऊ महिन्यापासून फरार असलेल्या खूनी हल्ल्यातील आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कामगिरी सोमवारी (दि.19) सायंकाळी रावेत येथे करण्यात आली.

योगेश दिनेश सावंत (वय 27, रा. इंद्रायणी सोसयटी, वंदे मातरम्‌ चौक, रुपीनगर, तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात मारहाण, दंगल करणे, खूनी हल्ला करणे, असे गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. खूनी हल्ल्याच्या गुन्ह्यात तो गेल्या नऊ महिन्यापासून फरार होता. तो रावेतच्या भोंडवे कॉर्नर येथील लंडन ब्रीजजवळ उभा असल्याची माहिती पोलिस नाईक निशांत काळे यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सापळा लावून पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त राजाराम पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलिस कर्मचारी अजय भोसले, निशांत काळे, किरण काटकर, उमेश पुलगम, सागर शेडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.