ठाणे – ठाणे येथील एका शालेय विद्यार्थिंनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीस 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. ही शिक्षा विशेष न्यायालयाचे न्यायाधिश दिलीप मुरुमसेकर यांनी सुनावली आहे. सुनील गव्हाणे असे आरोपीचे नाव असून त्याला 3 वर्षांच्या कारावास आणि 2 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी गव्हाणे याने 4 एप्रिल 2016 रोजी इयत्ता आठवीत शिकणा-या एका मुलीवर घरात एकटी असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिला असता मारहाणही केली होती. याबाबत पिडीत मुलीने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपी सुनील गव्हाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विशेष पास्को न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.