हैद्राबाद बलात्कार प्रकरणी आरोपींनी असा रचला कट… 

हैद्राबाद – पशुवैद्यकीय महिला डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार तिला पेटवून दिल्याच्या घटनेने देशभर संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार नराधमांना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान,  पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोंपीपैकी तीन आरोपी हे 20 वर्षांचे आहेत तर एकाचं वय हे 26 आहे. हे चारही आरोपी तेलंगणामधले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणीला टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचे पहिले होते. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचत तिची स्कुटी पंक्चर केली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झाली असल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाण्याने तेथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत निर्जनस्थळी घेऊन गेला. यावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आरोपींनी तिचा आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचे तोंड दाबून ठेवले. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने पीडितेचा गुदमरुन मृत्यू झाला.

त्यानंतर आरोपींनी पीडितेचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केले. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

दरम्यान, आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा करण्याची मागणी देशभरातून केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here