अहवाल तयार करून पाठविण्याची सूचना
पुणे – वित्त व लेखा विभागात कार्यरत असलेले अधिकारी विनापरवाना अनेक दिवस गैरहजर राहत असल्याने प्रशासकीय कामाकाजाचा खोळंबा होत आहे. त्यावर दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांची माहिती संकलित करून ती वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्याच्या सूचना लेखा व कोषागारे संचालनालयातील प्रशासकीय विभागाच्या प्रभारी संचालिका स्मिता पुराणिक यांनी दिल्या आहेत.
दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांमुळे कार्यालयीन शिस्तीबरोबरच प्रशासकीय कामकाजावर देखील परिणाम होतो. अशा अधिकाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जातो. अशा दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांची माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सहसंचालक कार्यालयांनी तसा अहवाल 10 जानेवारी व 10 जुलैपर्यंत वरिष्ठ कार्यालयाला कळवायचा आहे.