भाजपच्या “संकल्पपत्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात तरी राहणार की नाही? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. भाजपचा संकल्पपत्र हा निवडणूक जाहीरनामा आज जारी झाला. परंतु, यावेळेस आडवाणी आणि मुरली मनोहन जोशी उपस्थित नव्हते.

दोन्ही नेत्यांचे बरेच वय झाल्यामुळे पक्षाने त्यांना तिकीट नाकारले, ही बाब समजण्यासारखी आहे. परंतु, जाहीरनामा प्रकाशन समारंभात त्यांची उपस्थिती भाजपला महत्वाची वाटू नये, ही बाब खूप आश्‍चर्याची आहे. भाजपला दोन खासदारांपासून 282 पर्यंत पोहचविण्यात आडवाणी आणि जोशी यांची मोलाची भूमिका राहिली आहे. 2014 मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा त्यांना मंत्रीमंडळात सामावून न घेता मार्गदर्शक मंडळात पाठविण्यात आले. परंतु, आता मार्गदर्शक मंडळात तरी आडवाणी राहणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.