खंडणी प्रकरणातील फरारी आरोपींना चिपळूण येथे अटक

उंब्रज – दोन महिन्यापूर्वी खंडणीसह गंभीर मारहाण व इतर गुन्ह्यातील फरारी संशयित आरोपींना जेरबंद करण्यात उंब्रज पोलिसांना यश आले असून तीन संशयित आरोपींना चिपळूण येथून अटक केली. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सागर गोरख घाडगे (वय 28) रा. मरळोशी, ता. पाटण. हल्ली रा. कालगांव, ता. कराड, गोल्डन उर्फ सुशील दत्तात्रय वारे (वय 21) रा. कालगांव, ता. कराड, प्रविण सुभाष जाधव (वय 31) रा. कालगांव, ता. कराड अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये खंडणी व गंभीर मारहाण यासह इतर कलमान्वये संशयितांवर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर तिघे जण फरारी होते. सदरचे फरारी आरोपी हे चिपळूण येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयित आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला. त्यानुसार उंब्रज पोलिस ठाण्याचे पो. ना. लक्ष्मण जगदाळे, अजय शेडगे यांचे पथक चिपळूण येथे पाठवण्यात आले. या पथकाने रविवारी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. तर प्रविण जाधव यास अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सपोनि अजय गोरड व सतिश मयेकर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.