चेन्नई – भारताचा युवा बुद्धिबळपटू जी आकाश देशाचा 66 वा ग्रॅण्डमास्टर बनला आहे. आकाशने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) क्रमवारीत 2495 रेटिंग नोंदवल्यानंतर ग्रॅण्डमास्टर म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.
लहानपणापासून बुद्धिबळ खेळण्याची आवड जोपासणारा तमिळनाडूचा आकाश अचानक या खेळापासून शिक्षण पूर्ण करण्यासाठी दूर झाला होता. दोन वर्षांपूर्वीच त्याने पुन्हा एकदा पुनरागमन केले.
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आकाशने फिडे रेटिंग वाढविण्यावर प्रत्येक स्पर्धेत भर दिला. त्याला आता आपले रेटिंग 2600 पर्यंत वाढवायचे असून ग्रॅण्डमास्टरचा शिक्का बसल्याने त्याने आनंद व्यक्त केला आहे. 2012 साली राष्ट्रीय विजेतेपद मिळविल्यानंतर खरेतर आकाश चर्चेत आला. या विजेतेपदामुळे आकाश आंतरराष्ट्रीय मास्टर बनला होता.