30 कामगारांचा संसार रेल्वेच्या बोगद्यातच

पुणे – बोगद्यात राहायचं… तेथेच जेवायचं… तेथेच झोपायचं आणि जीव धोक्‍यात घालून काम करायचे. सुरुवातीला “थ्रिलिंग’ वाटणाऱ्या या गोष्टीमुळे शहारे उभे राहतात. ही गोष्ट आहे, मंकी हिलच्या घाट परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांची.

अडीच कि.मी. बोगद्यामध्येच चार महिने सुमारे 30 हून अधिक कामगारांचे वास्तव्य आहे. त्यांना दिवसाला 300 रुपये मानधन दिले जाते. बंगाल, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून हे कामगार आले आहेत.

तर रायगड जिल्ह्यातील नेरळमधून स्थानिक महिला आणि पुरूष कामगार ये-जा करतात. काही कमी जास्त झाले, काही साहित्य लागल्यास या कामगारांना थेट लोणावळा गाठावे लागते आणि ते ही कामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन येणाऱ्या बोगीतून. कामगारांसाठी येथे प्राथमिक उपचाराच्या साधनांसह डॉक्‍टरांची टीम आहे. रात्री काम थांबू नये यासाठी विजेची व्यवस्था केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.