देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएम किसान सम्मान निधीचा 18 वा हप्ता जमा होणार आहे. या योजनेत दरवर्षी 6000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येतात. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम जमा करण्यात येते. आतापर्यंत या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत.
पीएम किसानचा 18 वा हप्ता केव्हा येणार ?
पीएम किसान योजनेसंबंधीच्या साईटवर उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर, 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जमा करतील. येत्या 5 ऑक्टोबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
आतापर्यंत 34,000 रुपये जमा
आतापर्यंत पीएम किसान योजनेतंर्गत 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचा प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र शासनाने 34,000 रुपये दिले आहेत.