पुणे : पुण्यातील नामांकित ढोल, ताशा व ध्वज पथक गजर प्रतिष्ठानचा 12 वा वर्धापन दिवस टेंभेकर मळा येथे उत्साहात साजरा झाला. एक तप पूर्ण करुन पथकाने १३ व्या वर्षात पदार्पण केले. गजर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अनिकेत पोटे व सर्व माननीय सभासद यावेळी उपस्थित होते. या पथकाचे वैशिष्टय म्हणजे विविध खेळाडूंनी एकत्र येऊन याची स्थापना केली आहे. इतर कोणत्याही पथकातून वेगळे न होता स्वयंभू निर्माण झालेले हे पथक सभासदांप्रमाणेच खेळाडू वृत्तीने बहरत आहे.
वादनाबरोबरच सामाजिक बाबींचे भान ठेऊन पूरग्रस्तांना मदत, वारकरी सेवा, हडपसर येथील अनाथ आश्रमाला मदत, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबविले आहेत. गेल्या पंधरवड्यापूर्वी पुण्यात आलेल्या पुरामुळे नदीपात्रातील काही ढोल पथकांचे ढोल वाहून गेल्यावर मित्रत्वाच्या नात्याने 10 ढोल ढोलताशा महसंघाकडे सुपूर्त केले.
गजर प्रतिष्ठानच्या सराव शुभारंभाच्या निमित्याने उद्घाटन प्रमुख श्री. पुनित बालन – युवा उद्योजक व विश्वस्त श्री भाऊसाहेब रंगारी मंडळ, सौ. जान्हवी धारिवाल बालन – सीएम डी माणिकचंद ऑक्सीरिच, हेमंत रासने,पराग ठाकूर, अभिजित टेंभेकर या मान्यवरांनी उपस्थित राहून पथकास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गजर प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष अनिकेत पोटे यांसह या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.मिलिंद कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन श्री.शीरीन गोडबोले यांनी केले.