जालना – जालन्यातील एका 108 वर्षाच्या आजीसह याच आजीच्या 78 वर्षाच्या मुलीने करोनाला धोबीपछाड देत करोनावर मात केलीय.
गयाबाई चव्हाण असं या आजीचं नाव आहे. करोनामुळे आजकाल सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. वयोवृध्द माणसं कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत शंभरी ओलांडलेल्या गयाबाई चव्हाण या आजीने करोनाला हरवलंय.
आजीचं वय जास्त असल्यानं आजी आता फार काळ आपल्यात राहणार नाही याची भीती कुटुंबातील सदस्यांना वाटत होती.पण या वयात एकही आजार नसल्यानं गयाबाई चव्हाण यांनी थेट कोरोनाशी दोन हात करत त्यावर मात केली.
आमच्या सून बाईंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आम्ही 5 जण पॉझिटिव्ह आलो होतो.आईला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा तिला तिकडेच स्मशानभूमीत न्यावं लागेल की काय याची भीती होती पण ईलाज चांगले झाल्यानं आई बरी झाली याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या.