अबूधाबी : रोहित शर्मा यांच्या शानदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता संघाचा 49 धावांनी पराभव करत विजय साकारला. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता पण अखेर आज मुंबईने विजयाचं खात उघडलं. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.
That’s that from Match 5 as the Mumbai Indians win by 49 runs.
Scorecard – https://t.co/xDQdI54h5N #KKRvMI pic.twitter.com/j58dPCYVQl
— IndianPremierLeague (@IPL) September 23, 2020
विजयासाठी 196 धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघास 20 षटकांत 9 बाद 146 धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 33(12) तर दिनेश कार्तिकने 30(23), नितीश राणाने 24(18) , इआॅन माॅर्गनने 16(20) आणि आंद्रे रसेलने 11(11) धावा काढल्या. सलामीवीर शुभमन गिल 7(11) आणि सुनील नरेन 9(10) स्वस्तात माघारी परतले.
मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक व प्रभावी गोलंदाजी केली. ट्रेंट बोल्ट(4 षटकांत 30 धावा), जेम्स पॅटिसन(4 षटकांत 25 धावा), जसप्रीत बुमराह(4 षटकांत 32 धावा) आणि राहुल चहर (4 षटकांत 26 धावा) यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर काईरन पोलार्डने(3 षटकांत 21 धावा)1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक (टाॅस) जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात 195 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
मुंबईचा सलामीवीर क्विटंन डी काॅक अवघ्या 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवने 28 चेडूंत (6 चौकार व 1 षटकार) 47 धावा केल्या. रोहितने 54 चेंडूत (3 चौकार व 6 षटकार) सर्वाधिक 80 धावा करत संघाची धावसंख्या 177 पर्यंत पोहचवली. याव्यतिरिक्त सौरभ तिवारीने 21(13 चेंडू), हार्दिक पांड्याने 18(13 चेंडू) आणि कायरन पोलार्डने 7 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या.
कोलकाताकडून गोलंदाजीत शिवम मावीने 4 षटकांत 32 धावा देत सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर सुनील नरेनने 4 षटकांत 22 धावा देताना एक विकेट घेतली. आंद्रे रसेलने 2 षटक टाकले. त्याने 17 धावा देताना 1 विकेट घेतली. कुलदीप यादव, संदीप वारीयर आणि पॅट कमिन्स हे गोलंदाजीत महागडे ठरले आणि त्यांना एकही विकेट मिळवता आली नाही. कुलदीपने 4 षटकांत 39 तर कमिन्सने 3 षटकांत सर्वाधिक 49 धावा दिल्या. संदीप वारियरने 3 षटकांत 34 धावा दिल्या.