मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने होताना दिसत आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत सर्वच पक्षात स्पर्धा सुरु झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ‘एमआयएम’ची दोन मते शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार असल्याचे म्हटले जात असतानाच एमआयएमने या निवडणुकीत आपली मेगा एंट्री केली असून त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यातील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करताना एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे.
To defeat BJP, our party @aimim_national has decided to vote for Maha Vikas Aghadi (MVA) in the Rajya Sabha elections in Maharashtra. Our political/ideological differences however will continue with @ShivSena which is a partner in MVA along with @INCIndia and @Maha_speaks_ncp.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 9, 2022
ट्विटमध्ये त्यांनी, ‘भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत. आम्ही महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेसोबत आमचे राजकीय, वैचारीक मतभेद कायम असतील,” असे ट्विट खासदार इम्तियाज जलील यांनी करून त्यांची एमआयएमची भूमिका स्पष्ट केली आहे.
To defeat BJP, our party @aimim_national has decided to vote for Maha Vikas Aghadi (MVA) in the Rajya Sabha elections in Maharashtra. Our political/ideological differences however will continue with @ShivSena which is a partner in MVA along with @INCIndia and @Maha_speaks_ncp.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 9, 2022
दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले आहे की, “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे” “महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आलं आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.