संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा मंगळवारी (दि. 25) प्रस्थान ठेवणार असून बुधवारी (दि. 26) लाखो वैष्णवांसमवेत पालखी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळा सोमवारी (दि. 24) प्रस्थान ठेवणार असून मंगळवारी (दि. 25) देहूतील पहिला मुक्काम घेत पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.