न्यूयॉर्क : ऍपल कंपनीच्या एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला महिलांविषयीचे एक वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. ऍपल कंपनीत पुरवठा साखळीचे उपाध्यक्ष टोनी ब्लेव्हिन्स यांच्या महिलांविषयीच्या कथित व्हायरल व्हिडीओनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. ब्लेव्हिन्स मागील २२ वर्षांपासून ऍपलमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते. मात्र एका वाक्याने त्यांचा कोट्यवधींचा जॉब गमावला आहे
काही दिवसांपूर्वी एका महिलेसह ब्लेव्हिन्स यांचा कारमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर त्यांनी आता आपल्या २२ वर्षीय करिअरला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या सुरुवातीला टिकटॉकवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ब्लेव्हिन्स एका महिलेसोबत कारमध्ये दिसत आहेत. या महिलेने त्यांना तुम्ही काय काम करता हा प्रश्न केला होता ज्यावर उत्तर देताना “माझ्याकडे महागड्या कार आहेत, मी गोल्फ खेळतो, मला मोठे स्तन असणाऱ्या महिलांशी खेळायला आवडते आणि शनिवार- रविवारी मी सुट्टीचा आनंद घेतो”, असे ब्लेव्हिन्स यांनी सांगितले.
Apple’s Tony Blevins is leaving after making crude remarks in a TikTok video.
Below is the video: pic.twitter.com/k3BapC7D0z
— unusual_whales (@unusual_whales) September 29, 2022
टिकटॉकर डॅनियल मॅक यांनी एका कार शोमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी बोलावले होते. मॅक जेव्हा ब्लेव्हिन्स यांना कामाविषयी विचारतात त्यावेळी ब्लेव्हिन्स यांनी हे विचित्र व धक्कादायक उत्तर दिले आहे. मॅक यांनी ब्लेव्हिन्स यांना तुम्ही नेमकं काय काम करता ज्यामुळे एवढ्या महाग गाड्या तुमच्याकडे आहेत? असा प्रश्न केला होता ज्यावर ब्लेव्हिन्स यांनी १९८१ च्या ‘आर्थर’ सिनेमातील एका वाक्यावरून उत्तर दिल्याचे ब्लूमबर्गने सांगितले आहे.
दरम्यान, ब्लेव्हिन्स यांच्या व्हिडिओवर किंवा त्यांच्या राजीनाम्यावर ऍपलकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. ऍपलचे उपाध्यक्ष ब्लेव्हिन्स यांची कंपनीच्या पुरवठा साखळी कार्यात महत्वाची भूमिका होती. ऍपलच्या उत्पादनांसाठी पुरवठादार निवडणे व त्यांचे काम तपासणे अशी जबाबदारी ब्लेव्हिन्स यांच्यावर होती.