‘त्या’ व्यक्तीने माझ्यावर विष प्रयोग केला, पण…’ – दीदींनी केला मोठा खुलासा

मुंबई – अवघ्या जगावर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या गान कोकिळा, गानसम्राज्ञी, ‘लतादीदी’ अर्थातच लता मंगेशकर यांनी नुकतंच एक धक्कादायक खुलासा केला आहे. लता दिदींवर एकेकाळी विष प्रयोग झाला होता.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लता दिदींनी स्वतः याविषयी खुलासा केला आहे. दीदी म्हणाल्या कि, “या घटनेविषयी अनेक लोकांना आजही माहित नाही, आम्ही देखील फारसं बोलत नाही. ही घटना 1963 मध्ये घडली होती. त्यावेळी मला विषबाधा झाली होती आणि मी अनेक दिवस झोपून होते. मला खूप अशक्तपणा आला होता. हा प्रकार इतका भयंकर होता की मला उठून चालताही येत नव्हतं.’

माझं गाणं आता कायमचं बंद होणार, अशी अफवा देखील त्यावेळी पसरवण्यात आली होती. पण मला माझं गाणं संपवायचं नव्हतं. दरम्यान, माझ्यावर करण्यात आलेला विषप्रयोग नेमका कोणी केलाय ते आम्हाला कळल होतं. मात्र त्यावेळी त्या व्यक्तीविरोधात आम्ही काही अॅक्शन घेतली नाही. कारण आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पण तो व्यक्ती असा वागू शकतो याचं आम्हाला नवल वाटलं होतं. असं दीदी म्हणाल्या.

पण आपल्या जिद्दीच्या जोरावर लता दीदींनी पुनरागमन केलं. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या आहे. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचा वारसा मिळाला. 2001 मध्ये लता मंगेशकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय, 1969 मध्ये ‘पद्मभूषण’, 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि 1999 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही दीदींना गौरविण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.