सातारा जिल्यात ‘असे’ होते माउलींच्या पालखीचे नियोजन; जिल्हा प्रशासनाची माहिती

सातारा – उंच पताका झळकती । 
टाळ, मृदंग वाजती ।। 
आनंदे प्रेमे गर्जती । 
भद्र जाती विठ्ठलाचे ।।

आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा आज आपल्या वैभवी लवाजम्यासह धर्मपूरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. माऊलींच्या पालखी सोहळ्यासमवेत रथापुढे २७ दिंड्या तर रथामागे जवळपास २५० दिंड्या आहेत. सोहळ्यासोबत जवळपास दोन लाख वारकरी सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून यानिमित्ताने साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व जिल्हा परिषदेचे सी. ई.ओ कैलास शिंदे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी साधलेला खास संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पालखीचे नियोजन कसे केले जाते? तसेच पालखी जरी चार दिवसच साताऱ्यात असली तरीही तीच आमच्यासाठी एकादशी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×