‘त्या’ एका चुकीमुळे ट्रम्प यांचा मुलगा झाला ट्रोल

नवी दिल्ली –  जगातील प्रमुख महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे नवीन अध्यक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांची निवड जाहीर करण्यात आल्याने या महासत्तेतील महासत्तांतराच्या महानाट्यावर पडदा पडला आहे.

विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते आणि पुन्हा एकदा आपण निवडून येऊ, असा त्यांना विश्‍वास होता; पण अमेरिकेतील सुजाण जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना संधी न देता डेमोक्रॅटिक पक्षाचे मवाळ नेते बायडेन यांना संधी देऊन हे सत्तांतर घडवले.

यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्पच्या ट्विटची सोशल मीडियात चांगलीच खिल्ली उडवली गेली. ही निवडणूक होऊन आठवडा उलटल्यानंतर त्याने जनतेला मतदानाचे आवाहन केले. त्याला आपली चूक काही मिनिटांतच समजली. मात्र तोपर्यंत त्याचे ट्विट हजारो लोकांपर्यंत व्हायरल झाले.

सोशल मीडियावर या निडणुकीच्या चर्चे प्रमाणे एरिक ट्रम्पच्या ट्विटचेही चांगलीच चर्चा झाली. एरिकने मिनेसोटातील लोकांना घराबाहेर पडून मतदान करा, असे आवाहन केले.  मात्र  अवघ्या काही मिनिटांतच स्वतःची चूक लक्षात येताच त्याने संबंधित ट्विट डिलीट केले.  

याच ट्विटरवर त्याची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. नेटकऱ्यांनी त्याच्या ट्विटचा स्क्रिनशॉट काढत तो अधिकाधिक व्हायरल केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.