पिंपरी – पाणी पुरवठ्याबाबत आयोजित बैठकीत नगरसेवक चंद्रकांत नखाते व पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे यांच्यात हमरी-तुमरी झाली. दरम्यान नगसेवकांना बघून घेण्याची भाषा तांबे यांनी वापरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नगरसेवकांशी उद्धटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे. शहरात आठ दिवसातून एक दिवस पाणी कपात सुरू आहे.
विस्कळीत पाणी पुरवठ्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मंगळवारी तुफान राडा झाला. पाण्यावरून नखाते आणि तांबे हमरी-तुमरी होऊन त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली. मात्र, तांबे उद्धटपणे वागतात, ठेकेदारांशी त्यांचे साटेलोटे असल्याच्या थेट तक्रारी अनेक नगरसेवकांनी महासभेत केल्या.
दरम्यान, या बैठकीत झालेल्या राड्यात तांबे यांनी थेट नगरसेवकालाच आव्हान दिले. त्यावरून नगरसेवकांमध्ये तांबे यांच्यावरून आणखी रोष वाढला आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना महापौर जाधव म्हणाले की, “अधिकाऱ्यांचा नगरसेवकांशी उद्धटपणा चांगला नाही. अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करायला लावणार आहे.