शिरूर – टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचा नारीशक्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने निषेध करण्यात आला. नराधमास कठोर शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार लैला शेख यांना देण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शारदा भुजबळ, सचिव चंदना गायकवाड, उपाध्यक्षा सविता नवगिरे, यशस्वीनीच्या सचिव नम्रता गवारे, युवा स्पंदनच्या प्रियंका धोत्रे, अलका विधाते, कल्पना पुंडे आदि उपस्थित होत्या. निवेदनात म्हंटले आहे की, टाकळीहाजी येथे चिमुकलीवर नराधम दादु माळी याने अत्याचार केला असून त्याला फाशीची कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केलेली आहे.