जयपूर – सचिन पायलट यांनी थेट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारल्याने राजस्थानातील सत्तारूढ कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. अशातच एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे.
काय आहे ऑडिओ क्लिप?
गुरुवारी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस आमदारामध्ये झालेल्या चर्चेच्या तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या ऑडिओमधील आवाज केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा असल्याचा दावा आहे. यामध्ये मंत्री पैशांसंबंधी विचारतात समोरील व्यक्तीला दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल आणि वरिष्ठतेसंबंधीही काळजी घेतली जाईल, असे सांगत आहे.
दरम्यान, या ऑडिओ क्लिपचे दखल स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) घेतली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असणाऱ्या संजय जैन यांना ताब्यात घेतले होते. सत्यता पडताळल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल असे एसोजीच्या अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.