अमेरिकाः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमिरेका दौऱ्यावर असताना त्यांनी आज अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांची व्हाइट हाऊस येथे भेट घेतली. मोदी आणि ट्रम्प यांची डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. या पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश आलं असून मुंबईवर २००८ साली २६\११ हल्ल्यातील तहव्वूर हुसैन राणा याला भारताच्या हवाली करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या सर्वेाच्च न्यायालयाने तहव्वूर हुसैन राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालामुळे तहव्वूरला भारताला प्रत्यार्पणाचा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोदींनी मानले आभार
अमिरेकेच्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुसैनला भारताच्या हवाली करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले. “मुंबई हल्ल्याचा कट करणाऱ्याला भारतामध्ये खटला चालवण्यासाठी प्रत्यार्पण केलं जाणार आहे. यासाठी मान्यता दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो,” असं मोदी म्हणाले.
मला हे सांगायला आनंद होतोय….
मला हे सांगायला आनंद होतोय की माझ्या सरकारच्या प्रशासनाने कट रचणारा आणि जगातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक असलेल्याच्या (तहव्वूर हूसैन राणाच्या) प्रत्यार्पणला संमती दिली आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्याला भारतात कायदेशीर पद्धतीने शिक्षा दिली जाईल. त्याला भारतात परत पाठवलं जाणार आहे,” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
कोण आहे तहव्वूर हुसैन राणा ?
तहव्वूर हुसैन राणा हा मूळचा कॅनडामध्ये उद्योजक म्हणून काम करायचा. त्याचा मुंबईत झालेल्या २६\ ११ दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच्यावर हल्ल्यासाठी रेकी करणे आणि त्यासंदर्भातील नियोजनामध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि तो सिद्धही झाला आहे. तहव्वूर राणा सध्या लॅास एंजल्स येथील तुरुंगात आहे. लष्करी ए -तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा आरोप राणावर आहे. मुंबईत झालेल्या दहशवादी हल्ल्यात ३०० नागरिक जखमी झाले होते, तर १७५ निष्पापांना आपला जीव गमावावा लागला.