सक्षम पाठिंब्यासाठी अंकिताने मानले पालकांचे आभार

‘मणिकर्णिका’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या पालकांचे आभार मानले आहेत. आयुष्यातल्या प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगात ते अगदी स्तंभासारखे माझ्यासोबत राहिले. त्यांच्या सक्षम पाठिंब्यामुळेच आज मी इथे आहे. योग्य गोष्टींना पाठिंबा द्यायला हवा, हे त्यांनी माझ्या मनावर ठसवलं. त्यांनी कायमच मला पाठिंबा दिला. आयुष्यात कधी नैराश्‍य आलं तेव्हा तेच आपला आधारस्तंभ ठरले असल्याचं ती सांगते.

“मणिकर्णिका’मध्ये अंकिता लोखांडेने झलकारी बाईची ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. झलकारी बाई ही झाशीच्या राणीच्याच वेषामध्ये रणांगणावर येऊन शत्रूला चकवा देऊन निघून जात असे. त्यामुळे झाशीच्या राणीला रणांगणातून दुसरीकडे जाणे सहज शक्‍य होत असे. अलिकडेच आणखी एका मुलाखतीमध्ये अंकिताने आपल्याला इतक्‍यात लग्न करायचे नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. तिला सध्या तरी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लग्न झाल्यानंतरही तिला काम करत रहायचे आहे. पण त्याबाबत आता चर्चा नाही करायची. तिच्यात आणि सुशांत सिंह राजपूत दरम्यान काही शिजते आहे, अशी अफवा बी टाऊनमध्ये फिरायला लागली होती. पण अंकिताने “तसे काही नाही’ हे लगेच स्पष्ट करून टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)