fbpx

निगेटिव्ह रोलला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिल्याबद्दल बॉबीकडून प्रेक्षकांना धन्यवाद

आश्रम या वेबसिरीजमध्ये बॉबी देओलने बाबा राम रहिमची निगेटिव्ह प्रतिमा रंगवली. त्याच्या या रोलला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. “आश्रम’ या वेबसिरीजची खूपच चर्चाही झाली. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

या निमित्ताने बाबा राम रहिमच्या कृष्णकृत्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला. वेश्‍याव्यवसाय, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि अनेक गैरप्रकार बाबा राम रहिमच्या आश्रमातून चाललेले उघड झाले होते. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

बलात्काराच्या गुन्ह्यात बाबा राम रहिम सध्या तुरुंगात आहे. या खलनयकी भूमिकेला प्रेक्षकांनी खूपच सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल बॉबी देओलने प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद दिले आहेत. आपल्याला नकारात्मक रोलमध्ये बघून प्रेक्षक सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी कल्पनही केली नव्हती. आतापर्यंत अशी नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल, याचा अंदाज येत नव्हता. पण प्रेक्षकांनी जे प्रेम आणि आपुलकी दाखवली आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, असे बॉबीने प्रेक्षकांना उद्देशून इन्स्टाग्रामवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

प्रकाश झा यांची निर्मिती असलेल्या “आश्रम’च्या माध्यमातून बॉबी देओलने डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. “आश्रम चॅप्टर 2 : द डार्क साईड’ च्या माध्यमातून त्याच्या या वेबसिरीजचा दुसरा भागदेखील येतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.