पुणे – ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होती.
पंकजा मुंडेंकडून शरद पवारांचं जाहीर कौतुक; म्हणाल्या, “हॅट्स ऑफ…”
धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा. https://t.co/ug3f21o56g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2020
दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विट खात्यावरून, ‘पवारसाहेब हॅट्स ऑफ… आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले,’ असा संदेश पोस्ट करत शरद पवारांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पंकजा मुंडेंचं कौतुक केलं आहे. अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा, असंही ते म्हणाले आहेत.