नवी दिल्ली : करोनाविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या करोना योद्ध्यांना भारतीय सेनाकडून अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली जात आहे. रविवारी आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत हा कार्यक्रम झाला.
#WATCH Indian Air Force aircraft shower flowers on King George’s Medical University in Lucknow to express gratitude towards medical professionals fighting #COVID19. pic.twitter.com/idIGNnM2Wj
— ANI UP (@ANINewsUP) May 3, 2020
भारतीय हवाई दलाकडून सुखोईसारख्या लढावू विमानांनी कोलकाता, मुंबई आणि दिल्लीसारख्या देशातील वेगवेगळ्या शहरात करोना रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करत आहे. भारतीय लष्कराचे बॅन्ड या रुग्णालयांजवळ करोना योद्ध्यांचे मनोबल वाढवणार आहेत. तर भारतीय नौदल आपल्या युद्धनौका दिव्यांनी उजळवत करोना योद्धांना सलामी देणार आहे.
#WATCH Indian Air Force aircraft flypast Kalinga Institute of Medical Sciences in Bhubaneswar to express gratitude towards medical professionals fighting #COVID19. #Odisha pic.twitter.com/ZjcqO7kTe1
— ANI (@ANI) May 3, 2020
करोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्सने फ्लाय पास्ट केले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातचे कच्छ असे दोन फ्लायपास्ट एअर फोर्सकडून करण्यात आले. यामध्ये सुखोईसारखी भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा समावेश होता. समुद्रात भारतीय नौदलांकडूनही करोना योद्ध्यांना सलामी देण्यात आली.